श्री अंबिका योग सेवा केंद्र, केळवे रोड येथे १० ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर सेवक सेविकांसाठी निवासी शिबीर आयोजित केले होते. शिबिराची सुरुवात प. पू. निकम गुरुजींच्या पूजनाने झाली. सकाळी वैयक्तिक साधने नंतर सेवक सेविका ध्यानमंदीरात (अष्टांग हॉल) जमत. श्री. अजित पेजावरजी त्यांना योगाभ्यासाचा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत आणि त्यांच्या शंकांचे समाधान करत. तसेच निसर्गोपचाराची काही प्रात्यक्षिके ही करुन घेतली. स्टीम बाथ आणि मड थेरपी देण्यात आली. संध्याकाळी आश्रम परिसरात श्रमदान करत. शेवटच्या दिवशी इतर मदत गारांचा सन्मान केला. आणि प. पू. गुरुजींची प्रार्थना करुन शिबिराची सांगता झाली.